“तुझे नि माझे ब्रेक अप’च्या वाटेवर हृतिक

हृतिक रोशन आणि सुजैन खानचा घटस्फोट होऊन दोन वर्षे होऊन गेली आहेत. दोघांच्या फॅन्ससाठी हा निर्णय खूपच धक्कादायक आणि दुःखदायकही होता. हृतिकने आपले वैवाहिक आयुष्युअ टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. मात्र त्याचे सगळे प्रयत्न विफल ठरले होते. हे दोघे जरी विभक्‍त झाले असले, तरी आता दोघांनीही कटूता बाजूला ठेवून पुन्हा एकदा मैत्रीचे संबंध कायम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांच्यात पुन्हा भेटी गाठी व्हायला लागल्या आहेत. आपल्या मुलांसाठी तरी आपण आपापसातील तणाव बाजूला ठेवून सौहार्दाचे संबंध कायम ठेवले पाहिजेत, हे दोघांनीही मनोमन मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यात जरी पती पत्नीचे रिलेशन कायम नसले तरी मित्रत्वाचे रिलेशन पुन्हा वाढू लागले आहे. हे दोघेही एखाद्या कार्यक्रमाला अनेकदा एकत्र असतात. फॅमिली गेट टुगेदरसाठीही बऱ्याचदा दोघेही एकत्रच असतात. त्यांनी एकत्र हॉटेलिंग केल्याचेही बघितले गेले आहे. हृतिकच्या वाढदिवसाला सुजैनने केक आणला होता आणि दोन्ही मुलांसह दोघांनी एन्जॉयपण केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता हृतिकला पुन्हा एकदा लग्न करावेसे वाटायला लागले आहे. त्याने लग्नासाठी जिची निवड केली आहे, ती चक्क दोन मुलांची आई आहे. ही लव्ह लेडी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच पहिली पत्नी सुजैनच आहे, असा साक्षात्कार नुकताच झाला आहे. कारण प्रयत्न करूनही सुजैनला विसरणे शक्‍य नाही, असे त्याचे ठाम मत झाले आहे. सुजैन पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात यावी, असे त्याला मनोमन वाटते आहे. म्हणून पुन्हा एकदा सुजैनबरोबर लग्न करायचा त्याचा इरादा आहे. दोघांच्या पुन्हा लग्न करण्याचा विषय पूर्वीही चर्चेत आला होता. पण हृतिक आणि सुजैनने ही शक्‍यता फेटाळली होती. अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिकाने विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा अर्जुन रामपाल आणि सुजैनची जवळीकच हृतिक आणि सुजैनच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरली होती. तिकडे कंगणाच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)