तुकोबांच्या पालखी सोहळ्याची लगबग

देहू गावात महावितरण, वैद्यकीय, ग्रामपंचायत प्रशासनाची तयारी पूर्ण

देहूगाव – जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी 334 वा पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. मंदिरातील किरकोळ कामे वगळता पालखी रथाचे विविध कामे पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे देहू मुख्य मंदिरातून सोमवारी (दि. 24) प्रस्थान ठेवणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. महावितरण, वैद्यकीय विभाग तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय भाविकांना रांगेत दर्शन घेण्यास दर्शनबारी तयार केले आहे. सोहळ्यातील पालखी रथास जुंपण्यास आणि चौघडा गाडीसाठी लागणारे बैलजोडीची निश्‍चित करण्यात आले आहे. चांदीचे रथ व पालखी, गरूड टक्‍के, अब्दागिरी, चोप आदी साहित्यांना चकाकी देण्यात आली आहे.तसेच पालखी रथाचे विविध कामे करण्यात आली आहेत.

पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध
यात्रेपूर्वी रुग्णालयात पुरेसा औषधांचा साठा करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली. रुग्णांसाठी जुलाब-उलट्या, हिवताप, अंगदुखी, टायफॉईड, डेंग्यू या आजारांवर लागणारी औषधे व याशिवाय प्रतिजैविके व अन्य आजारांवर लागणाऱ्या औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, ही औषधे कमी पडणार नाहीत याची दक्षता आरोग्य विभागाकडून घेण्यात आली असल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली.

40 दुकानांना सूचना वजा नोटीस…
यात्रेपूर्वी देहूमध्ये मुख्य मंदिर, वैकुंठगमण मंदिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग 22 ते 26 जून असा सुरू ठेवण्यात आला आहे. गाथा मंदिरात जागा व बसण्यास टेबल, खूर्चीचे साहित्याची सहकार्य न मिळाल्याने तेथील बाह्यरूग्ण तपासणी केंद्र ग्रामपंचायती जवळ सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने यात्रापूर्व काळात भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा, गटारांची साफसफाई, इंद्रायणी नदीच्या घाटाची साफसफाई, जंतूनाशक आजारांसाठी धुराडी व फवारणीसाठी आदी कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयास लेखी पत्रव्यवहार देखील केल्याने ग्रामपंचायतीने पूर्ण करण्यात येत आहे. तसेच परिसरातील हॉटेल, दुग्धालये, भोजनालये, चहाच्या टपऱ्या आदी 40 दुकानांना सूचना वजा नोटीस दिल्या आहे.

वैद्यकीय पथक तैनात
देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोजचे साधारण 150 ते 200 रुग्ण तपासले जातात. यात्रा काळात या स्थानिक रुग्णांबरोबरच 450 ते 500 अतिरिक्‍त रुग्णांना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. यासाठी अतिरिक्‍त कर्मचारी वर्ग लागतो. त्याची व्यवस्थाही प्रशासनाकडून केली जात असते. 22 ते 26 जून या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, एक औषध निर्माता, तीन परिचर, एक वाहन चालक यांच्याबरोबरच प्रतिनियुक्‍तीवर पाच वैद्यकीय अधिकारी, 10 आंतरवासिता डॉक्‍टर, तीन आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सहाय्यक, 18 आरोग्य सेवक, 15 आरोग्य सेविका व तीन औषध निर्माण अधिकारी, तर रुग्णवाहिका सहा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.