तीन हजार शेतकऱ्यांना 89 लाखांचा पीकविमा

दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार
शेवगाव – पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत खरीप हंगामातील कपाशी व मुगाला नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. शेवगाव तालुक्‍यात जिल्हा सहकारी बॅंकेत विमा भरलेल्या दोन हजार 997 शेतकऱ्यांना दोन्ही पिकांचा 88 लाख 16 हजार 553 रुपये भरपाई मिळाली आहे. ही भरपाई दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती विकास अधिकारी भाउसाहेब चेके यांनी दिली. अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकांत विमा भरलेल्या शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम वेगळी आहे.
तालुक्‍यात अमरापूर शाखेत 259 कपाशी सभासदांना 6 लाख 71 हजार 347 रुपये व मूग पिकाला 110 सभासदांना 5 लाख 16 हजार 228 रुपये, चापडगाव 316 कपाशी शेतकरी 6 लाख 21 हजार 310 रुपये व मूग 34 शेतकरी 2 लाख 1 हजार 959 रुपये, घोटण 499 कपाशी शेतकरी 8 लाख 65 हजार 483 रुपये, मूग 6 शेतकरी 21 हजार 684 रुपये, हातगाव 1 शेतकरी एक हजार 542 रुपये, मूग 147 शेतकरी 5 लाख 6 हजार 157 रुपये, खरडगाव 558 कपाशी शेतकरी 18 लाख 5 हजार 427 रुपये व मूग 13 शेतकरी 62 हजार 560 रुपये, राक्षी 316 कपाशी शेतकरी 86 लाख 6 हजार 234 रुपये व मूग 37 शेतकरी एक लाख 53 हजार 284 रुपये, शेवगाव मार्केट शाखा 232 कपाशी शेतकरी 77 लाख 3 हजार 10 रुपये व मूग 17 शेतकरी 89 हजार 607 रुपये, शेवगाव टाऊन शाखा 40 कपाशी शेतकरी 78 हजार 177 रुपये अशी रक्कम जमा होणार आहे.
केवळ मुगासाठी बोधेगाव 14 शेतकरी 45 हजार 137 रुपये, बालमटाकळी 211 शेतकरी 8 लाख 40 हजार 544 रुपये, भातकुडगाव 19 शेतकरी 92 हजार 92 रुपये, दहिगाव-ने 7 शेतकरी 1 लाख 15 हजार 231 रुपये, ढोरजळगाव 116 शेतकरी 3 लाख 3 हजार 382 रुपये, लाडजळगाव 26 शेतकरी 93 हजार 676 रुपये, मुंगी 12 शेतकरी 50 हजार 994 रुपये आणि शहरटाकळी 7 शेतकरी 33 हजार 488 रुपये याप्रमाणे दोन दिवसांत त्या त्या शाखेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत बाजरी, तूर अशा पिकासाठी अनेक शतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे. या पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असताना भरपाई मात्र मिळाली नसल्याने या पिकांना पीकविमा भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
शेवगाव परिसरात कापसाची मोठया प्रमाणात पेरणी झालेली असून यंदा सर्वच पिकाला बोंडअळीचा फटका बसला आहे; मात्र फक्त शेवगाव व एरंडगाव मंडलच कपासीच्या पीकविम्यासाठी पात्र ठरल्याबद्दल कपाशी उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)