तीन हजार विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत

चैतन्य विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

ओतूर-चैतन्य विद्यालय ओतूरच्या महालक्ष्मी मैदानावर 70वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चैतन्य विद्यालय, गाडगे महाराज विद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ओतूरच्या तीन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायतीची प्रात्यक्षिके सादर केली. एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नं. 2 व प्रतिभाताई पवार प्रशाला ओतूर यांनी समरगीते सादर केली.
याप्रसंगी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाचे अध्यक्षस्थान चैतन्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. संजय वेताळ यांनी भूषविले. विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध परेड पाहून आपण लाल किल्ल्यावर आहोत असे गौरव उद्‌गार त्यांनी काढले. जीवनात मोठे व्हायचे असेल तर शिस्त अत्यंत महत्वाची आहे, व्यसनांपासून दूर रहा, आपले आई -वडिल, आजी -आजोबा यांचा सांभाळ, सेवा करा, आपला परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
ओतूर परिसरातील विविध संस्थांचे ध्वजारोहण अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चैतन्य विद्यालयात ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, गाडगे महाराज – मुख्याध्यापक मंगल साबळे, सावित्रीबाई फुले विद्यालय- डॉ. संजय वेताळ, ज्येष्ठ नागरिक संघ -बबनराव फापाळे, नगर वेशीवर- उपसरपंच भाग्यश्री गिते, मंडल अधिकारी कार्यालय -दत्तात्रय लवांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना विश्वासराव डुंबरे आणि सर्जेराव गाढवे यांच्या वतीने खाऊवाटप करण्यात केले. याप्रसंगी अनिल तांबे, वैभव तांबे, नीतिन पाटील, अरुण वाकचौरे, दामोदर पानसरे, अशोक फापाळे, मोहित ढमाले, धनंजय डुंबरे, भरत अवचट, स्मिता डुंबरे, डॉ. सुनिता वेताळ, आत्माराम गाढवे, प्रभाकर तांबे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, महादेव ओतूरकर, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, अमोल डुंबरे, महेंद्र पानसरे, ज्ञानेश्वर पानसरे, बशीर शेख, मंगल साबळे, राहुल पिंगट, लक्ष्मण फापाळे, राजू ठोकळ, सुमन गवारी, सर्व शाळांचे शिक्षक व बहुसंख्येने पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम हांडे यांनी केले. सूत्रसंचालन शरद माळवे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)