तीन लाख जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींची नोंदणी

अस्मिता योजना : 16 हजार 375 स्वयंसहाय्यता समुहांची नोंदणी
मुंबई – ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पांच रुपयांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अडीच महिन्यामध्ये 3.13 लाख जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींची नोंदणी करण्यात आली असून 16 हजार 375 स्वयंसहाय्यता समुहांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 7 लाखपैकी 3.13 लाख म्हणजे 50 टक्के किशोरवयीन मुलींची नोंदणी करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अवघ्या पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या ग्रामविकास विभागाच्या अस्मिता योजनेचा शुभारंभ 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनी झाला आहे. या योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे आठ पॅडचे एक पाकीट पाच रुपयांत मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही सवलत अस्मिता कार्डधारक मुलींना मिळत आहे. पहिल्या टप्प्यात सात लाख मुलींना अस्मिता कार्ड दिले जाणार असून आजपर्यंत 3.13 लाख जिल्हा परिषद शाळेतील मुलींची नोंदणी झाली आहे. उर्वरित मुलींची नोंदणी प्रगतीपथावर असून लवकरच पहिला टप्पा पूर्ण होणार आहे.

नोंदणी केलेल्या समुहांची संख्या नागपूर विभागात 3 हजार 246, नाशिक विभागात 2 हजार 597, पुणे विभागात 2 हजार 828, अमरावती विभागात 2 हजार 595, औरंगाबाद विभागात 3 हजार 153, तर कोकण विभागात 1 हजार 956 अशा प्रकारे 16 हजार 375 स्वयंसहाय्यता समुहांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)