तीन नव्या मार्गावर धावणार “पीएमपी’

प्रवाशांकडून होत होती मागणी : 4 सप्टेंबरपासून होणार उपलब्ध

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांच्या सेवेसाठी काही मार्ग नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या बसची वारंवारता तीस मिनिटांपासून दोन तासांपर्यंत असून दि. 4 सप्टेंबरपासून या मार्गावर पीएमपी धावणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांकडून काही बसमार्ग नव्याने सुरू करण्याची मागणी सातत्याने होत असते. यानुसार बसची उपलब्धता पाहून नवे मार्ग सुरू केले जातात. त्यानुसार स्वारगेट ते कापूरहोळ (293), कात्रज ते सिंहगड कॉलेज (294) तर, कुंबरे पार्क ते स्वारगेट (76) असे नव्याने मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. वेळापत्रकानुसार स्वारगेट येथून सकाळी 4.45 वाजता पहिली बस सुटणार असून दर तीस मिनिटांच्या वारंवारीतेने ती धावेल. या मार्गावर दिवसात 54 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कात्रज येथून सिंहगड कॉलेजसाठी सकाळी 6.25 वाजता बस सुटणार असून दर 50 मिनिटांच्या वारंवारीतेने ती धावणार आहे. एकूण 32 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर, कुंबरे पार्क येथून स्वारगेटसाठी सकाळी 6.40 वाजता बस सुटणार असून दर दीड तासाच्या वारंवारीतेने ती धावेल. या मार्गावर एकूण 16 फेऱ्या होणार आहेत. दरम्यान, पुणे स्टेशनवरून हिंजवडीसाठी सुटणारी मार्ग क्रमांक 115 आणि 33 या बसेस आता पुणे स्टेशन या डेपोतून न सुटता थेट स्टेशनसमोरील मौलदीना स्थानकावरून सुटणार आहेत. यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या मार्गावरून प्रवास करून सार्वजनिक सेवेत हातभार लावावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

काही बसच्या मार्गांचे विस्तारीकरण
– मार्ग क्रमांक 64 स्वारगेट ते वारजे माळवाडी ही बस आता कोंढवा गेटपर्यंत पुढे नेण्यात येणार आहे.
– मार्ग क्रमांक 113 अप्पा बळवंत चौक ते पिंपळेगुरव ही गाडी मेडीपॉईंट मार्गे धावणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)