तिसरे ई-कचरा संकलन केंद्र सुरु

पिंपरी – कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमान शहरातील तिसरे ई-कचरा संकलन केंद्र प्राधिकरणातील भेळ चौकात “अ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर सुरु करण्यात आले. पहिल्याच दिवशी या केंद्रात 70 किलो ई-कचरी संकलीत करण्यात आला. हे संकलन केंद्र प्रत्येक महिन्याचा तिसऱ्या रविवारी सुरु राहणार आहे.

या ई-कचरा संकलन केंद्राचे रविवारी (दि. 22) उद्‌घाटन झाले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. ई-कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे वेळीच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. नागरिकांमध्ये ई-कचऱ्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे शैलजा मोरे आणि अमित गावडे यांनी यावेळी सांगितले.

शहरातील पहिले ई-कचरा संकलन केंद्र पिंपळे सौदागरमधील रोजलॅंड सोसायटीमध्ये, दुसरे यमुनानगरमधील तुळजाभवानी मंदिराजवळ आणि तिसरे निगडी प्राधिकरणातील भेळ चौकात अ क्षेत्रीय कार्यालयासमोर सुरु करण्यात आले आहे. यमुनानगरमधील ई-कचरा संकलन केंद्र डिसेंबर 2017 मध्ये सुरु करण्यात आले. हे केंद्र प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी सुरु असते. खास लोकाग्रहास्तव शहरातील तिसरे केंद्र भेळ चौकात आज (दि. 22) पासून सुरु करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)