कुरवली- तावशी (ता. इंदापूर) येथे ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय बारामती यांच्या वतीने कृषीकन्या शिवानी माने, पायल मुळीक, किर्ती पवार, प्रज्ञा सावंत, किरण सातपुते, दीपाली शेळके, के सुहार्षीनी यांच्यातर्फे प्रदर्शन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. इंदापूर पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तुषार जाधव यांनी ऊस पिकातील हुमणी अळी व मका पिकावरील लष्कर अळीच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत चर्चासत्र भरवण्यात आले. पिकांवरील प्रादुर्भावाची कारणे व उपाययोजना याबद्दल माहिती दिली. आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड कशी करावी, याबद्दल डॉ. विजय मदने व गिरीधर खरात यांनी मार्गदर्शन केले.