ताळेबंदांच्या आधारावर होणार गुंतवणूक

मुंबई: देशातील आणि परदेशातील परिस्थितीत बरीच संदिग्धता असली तरी सध्या शेअरबाजार निर्देशांक वाढत आहे. मात्र आगामी काळात कंपन्यांच्या ताळेबंदाच्या आधारावरच निर्देशांकांना दिशा मिळू शकेल असे डी. एस. पी. ब्लॅक रॉकचे शेअरबाजार विभाग प्रमुख विनीत सांबरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, एकीकडे कॉर्पोरेट कंपन्यांच्या या तिमाहीतील चांगल्या निकालांमुळे मागणी वाढत आहे. विशेष करून डिजिटल प्रकल्पांचा आवाका वाढवणाऱ्या आयटी कंपन्या, एफएमसीजी, ग्रामीण ग्राहकांमुळे मागणीत वाढ दर्शवणाऱ्या कंपन्या, अपेक्षांपेक्षा चांगले परिणाम दाखविणाऱ्या सिमेंट कंपन्या व कर्जामध्ये अधिक मागणी दर्शवणाऱ्या खाजगी बॅंका आहेत. मात्र एकंदरच काही निवडक कंपन्यांमुळे (कॉर्पोरेट बॅंक्‍स,फार्मा) आकडे खाली खेचले गेले.
दुसरीकडे वित्तीय तूट, तेलाचे भाव, रोखे उत्पन्न, महागाई यांसारखे कल बघायला मिळत आहेत. मात्र हे कल इतके पण खराब नाहीत. 2014 मध्ये नवीन सरकार आल्यावर नियंत्रित झालेली वित्तीय तूट, कमी महागाई व स्थिर चलन यांसारख्या बाबींमुळे निर्देशांकाने 50 टक्के उसळी मारली. तसेच स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांकांत 110 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. मात्र 2018 मध्ये बाजारात चढ-उतार बघायला मिळाले. जानेवारी 2018 मध्ये 36,200 सह निर्देशांकांने उच्चांक गाठला. त्यानंतर 2 महिन्यात 10 टक्‍के कमी झाला. नंतर पुन्हा 6 ते 7 टक्‍के वाढला आणि परत घसरण झाली. स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांकांत उच्चांकापासून 15 ते 20 टक्‍के घसरण झाली तर काही वैयक्‍तिक स्टॉक्‍समध्ये देखील 30 टक्‍के घसरण झाली.
आमचे मूलभूत तत्त्वांवर लक्ष्य केंद्रित असल्यामुळे होणारी घसरण (करेक्‍शन्स) याकडे आम्ही संधी म्हणून पाहतो. देशांतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीमुळे 2017 हे इक्विटी बाजारपेठेसाठी अत्यंत चांगले होते. सांबरे म्हणाले की, बाजारपेठेतील परतावा सरासरीपेक्षा जास्त असलेल्या मूल्यांकनांमुळे आम्हाला असे वाटते की येत्या काही महिन्यात बाजारपेठेतील परतावा हा उत्पन्न वाढीशी निगडीत असेल.
ते पुढे म्हणाले की, ऑटो, व्हाईट गुडस, कन्झ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, खासगी बॅंका, आरोग्य सेवा व सिमेंटमधील काही निवडक स्टॉक्‍स तसेच गॅस युटिलिटीज यांसारख्या क्षेत्रांबाबत आम्ही सकारात्मक आहोत, तर आयटी, टेलिकॉमसारख्या क्षेत्रांमध्ये सावधगिरीने गुंतवणूक करणे गरजेचे आहे. वाढते दरडोई उत्पन्न, वित्तीय सेवांचा विस्तार, संरक्षण, रस्ते, रेल्वे व शहरी पायाभूत सुविधा यांमध्ये सरकारची वाढती गुंतवणूक तसेच टेक्‍स्टाईल्स व स्पेशालिटी केमिकल्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये निर्यात संधी या बाबी 2018 मध्ये विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)