तायडे यांना पोलीस महासंचालक सन्मान पदक

लोणावळा – धावत्या रेल्वेतून खाली पडलेल्या तरुणीला वाचवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल पवन तायडे यांना त्याच्या या कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मान पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी हे पदक तायडे यांना बहाल करण्यात येणार आहे. पवन तायडे हा सध्या लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

25 सप्टेंबर 2016 रोजी लोणावळा रेल्वे स्टेशनवर एका धावत्या रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना एक युवती पाय घसरून फलाटावर पडली. त्यावेळी तिचे अर्धे शरीर धावत्या रेल्वेखाली आणि अर्धे शरीर फलाटावर अशी स्थिती होती. कॉन्स्टेबल तायडे यांनी तात्काळ तिला बाहेर खेचल्याने त्या मुलीचा जीव वाचला होता. पवनच्या या धाडसाचे कौतुक अभिनेता अक्षयकुमार यानेही सोशल मीडियावर केले होते.

घटना घडली त्या दिवशी सकाळी पुणे येथे मराठा मोर्चा असल्याने पुण्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होती. यामुळे लोणावळा शहर पोलिसांकडून स्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्या सोबतीला बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राहुल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय गायकवाड आणि पवन तायडे बंदोबस्तासाठी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)