तापसीला नको नवाजुद्दीनची कंपनी

“पिंक’, “बेबी’ आणि “नाम शबाना’ सारख्या सिनेमांमधून आपल्या हरहुन्नरी ऍक्‍टिंगची झलक दाखवलेल्या तापसी पन्नूने नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तिच्या या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त होते आहे. एका थ्रिलर फिल्मसाठी तापसीच्या नावाची शिफारस झाली होती. तिच्याबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात असणार हे तिला समजले होते. त्यावर तापसीने आक्षेप घेतला. एक मर्डर मिस्ट्री असलेल्या या सिनेमाचे कास्टिंग डायरेक्‍टर हनी त्रेहन असणार आहेत. त्यासाठी त्यांना तापसी आणि नवाजुद्दीनसारखे हरहुन्नरी कलाकारच हवे होते. तापसीच्या निर्णयामुळे हनी त्रेहन यांना धक्काच बसला. तिने नवाजुद्दीनबरोबर काम करायला नकार का दिला, हे मात्र कोणीच स्पष्ट केले नाही. तापसीकडूनही त्याबाबत कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तापसी सध्या काम करत असलेल्या अन्य सिनेमांपैकी “मुल्क’चा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये तिच्याबरोबर ऋषी कपूर असणार आहेत. हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित असणार आहे. याच वर्षी 27 जुलैला “मुल्क’ रिलीज होणार आहे. यापूर्वी “पिंक’मध्ये तापसीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची केमिस्ट्री उत्तम साकारली होती. आता तापसी आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत. “बदला’नावाचा हा सिनेमादेखील एक मर्डर मिस्ट्री असणार आहे. या जूनच्या मध्यापासून या सिनेमाचे शुटिंग सुरू होणार आहे. लंडन आणि स्कॉटलंडमध्ये या सिनेमाचे शुटिंग होणार आहे. तापसी आणि तिचा बिजनेसमन प्रियकराच्या भोवती या सिनेमाची कथा फिरत असेल. यापूर्वी “नाम शबाना’मध्ये ती मनोज वाजपेयी आणि अक्षय कुमारबरोबर दिसली होती. इतक्‍या मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर कामाची संधी मिळाल्याने तिने नवाजुद्दीनबरोबरच्या सिनेमाला नकार दिला असावा. याशिवाय तिच्याकडे असलेल्या सिनेमांची संख्याही खूप जास्त आहे. आगामी काळातल्या “सूरमा’, “मुल्क’, “मनमर्जियां’ आणि तेलगू “नीवेवरू’ या सिनेमांमध्ये ती दिसणार आहे. दीपिका आणि प्रियांकापेक्षाही तिचे शेड्युल जास्त बिझी आहे. म्हणूनही तिने हा सिनेमा नाकारला असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)