तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कर्मचाऱ्यांविना कार्यालयात शुकशुकाट

वडूज, दि. 31 (प्रतिनिधी)- कराड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि लिपिक यांना वाळू तस्करांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ खटाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केले.
कराड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मकरंद साळुंखे लिपिक संतोष गुल्हाने यांना वाळू माफिया कडून झालेल्या मानहाणीच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी आज दि.30 पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. खटाव तालुक्‍यातील महसूल कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला.
वाळू माफियांच्या यापूर्वी आशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होत असून त्या माफियावर कार्यवाही होत नाही तोपर्यत महसूल कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. कामबंद आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. तसेच प्रशासनातर्फे जनतेच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल दिलगिरी व्यक्त करीत असल्याचा फलक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)