तस्मै श्री गुरुवे नमः…(प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

आपल्या भारतात किंबहुना संपूर्ण जगात गुरूला खूप महत्वाचं स्थान आहे. एकलव्याने तर गुरु द्रोणाचार्य यांचा पुतळा समोर ठेऊन धनुर्विद्येत निपुणता मिळवली. केवढी आपल्या गुरूंवरती अपार श्रद्धा आणि प्रेम, विश्वास होता आणि द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागताच कसलाही विचार न करता आपल्या हाताचा अंगठा कापून दिला.

सर्वांचा पहिला गुरु म्हणजे “आई” . आई बाळ गर्भात असतानाच त्याच्यावर संस्कार करायला सुरुवात करते. मुल जन्मल्या पासून त्याला काय हवं काय नको ते आईला नक्की माहित असतं. त्याच प्रमाणे आपल्या गुरूला आपल्यात कोणते गुण, दोष हे आहेत हे अचूक ओळखता येतात व आपल्याला आपल्यातील दोष नष्ट करण्यास व योग्य दिशेने जाण्यास आपले गुरु मार्गदर्शन करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशी कित्येक उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु जिजामाता.  महाराजांना त्यांनी घडवलं म्हणूनच आपलं स्वराज्य निर्माण झालं. आपल्याला शून्यातून घडवण्याचं काम गुरु करतात. मला तर आसं जाणवतं कि प्रत्येक व्यक्ती मध्ये गुरु आहे याला अपवादच नाही. मित्र असो वा शत्रू पप्रत्येकांकडून  आपण काहीना-काही नेहमी शिकत असतोच ना? प्रत्येका कडून काही तरी घेण्यासारखं निश्चितच आहे. मी गुरु ला कधी मित्रा मध्ये पहातो तर कधी लहान मुलांन मध्ये.. अहो इतकंच काय पुस्तकात सुद्धा मला गुरुचं दर्शन होतं.

महाभारतात कृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारून त्याला मार्गदर्शन केलं आणि कर्तुत्व किती महत्वाचं आहे हे दाखवून दिलं आणि महाभारत घडलं. जर भगवान श्रीकृष्णच जर नसते तर काय घडलं असतं ? नक्कीच महाभारत घडलं नसतं. मानव जन्मापासून मरेपर्यंत शिष्य याच अवस्थेत राहतो. मी धन्यता मानतो की माझे आई-वडील, मला भेटलेले गुरु यांनी केलेले संस्कार यामुळे जीवन समाधानाने जगण्यास मला मदत होत आहे.

   – जीत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)