तळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

घोडेगाव-शिवसेनेची ध्येय धोरणे आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील तळेघर येथील सुमारे 40 युवकांनी काल लांडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

खासदार आढळराव पाटील यांचे नेतृत्त्वच आदिवासी भागाचा विकास करू शकते याची आम्हाला खात्री आहे. आजवर आम्हा आदिवासी तरुणांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. मात्र निवडून येताच आमच्याकडे पाठ फिरवली अशा भावना या तरुणांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर आम्हा तरूणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी दादांनी प्रयत्न केल्याचे सांगत भविष्यकाळात आदिवासी भागात वाड्या-वस्त्यांवर जाऊन शिवसेनेचा प्रचार करून शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करणार असल्याचे या सर्व युवकांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, अमोल अंकुश आदी उपस्थित होते.

खासदार आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या संकेत पांडुरंग कावळे, अजित अशोक इष्टे, संदीप सुरेश इष्टे, विशाल शांताराम मेचकर, विशाल विष्णू इष्टे, विशाल किसन इष्टे, प्रदिप सुरेश इष्टे, रामदास धर्मा मेमाणे, संतोश यशवंत इष्टे, अक्षय यशवंत शेळकंदे, योगेश सखाराम धादवड, दिनेश सखाराम धादवड, स्वप्नील पांडुरंग कावळे, सुमित पांडुरंग कावळे, विजय शिवाजी इष्टे, प्रफुल्ल पुनाजी इष्टे, महेश काळू इष्टे, संदीप काळू इष्टे, मंगेश दशरथ शेळके, राहूल दशरथ शेळके, मयूर दशरथ शेळके, विनायक रामचंद्र कोकणे, रोहन अशोक इष्टे, ऋषाल शांताराम मेचकर, नितीन अंकुश मेचकर, आदिनाथ ज्ञानेश्वर मेचकर, अभिषेक दत्तात्रय मोहंडूळे, निलेश वंसत इष्टे, किशोर प्रभाकर हिले, वैभव ज्ञानेश्वर लोहकरे, विजय किसन जठर, सुरज अंकुश कोकाटे, विनोद मारूती विरणक, संतोष अनंता इष्टे, सुदाम शांताराम इष्टे, पुंडलिक विलास इष्टे, सचिन विलास इष्टे, अनिल गोविंद मेमाणे, दत्तात्रय शांताराम तिटकारे आणि किरण बाळू इष्टे आदी युवकांचे स्वागत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.