तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाला 97.47 टक्‍के निकाल

तळेगाव दाभाडे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 97.47 टक्के लागला आहे. धनश्री संतोष मुनोत (93.84 टक्के), मानसी शरद कदम (91.84 टक्‍के), सोमेश विश्‍वास बाम (88.46 टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. यंदा 279 परीक्षार्थींपैकी 272 जण उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण विभागात धनश्री व मानसीने सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 88.88 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 94.33 टक्के लागला. तंत्रशाखेचा निकाल 75.67 टक्के लागला. कला शाखेची श्‍वेता तुकाराम ठोसर प्रथम (81.69 टक्के), ज्ञानेश्‍वरी संतोष थिटे (78.76 टक्के), तर निकिता गणेश जाधव हिला 76.76 टक्‍के गुण मिळाले. वाणिज्य शाखेचा जलाज संजय ओसवाल (83.23), प्रांजल संजय ओसवाल या सख्ख्या बहिण भावाने प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रद्धा रामदास घोटेकर (80.92 टक्के) मिळवून तिसरी आली. संस्था अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर यांनी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ, उपप्राचार्य एस. एस. ओव्हाळ व डॉ. संभाजी मलघे आणि तंत्रविभाग प्रमुख एन. टी. भोसले यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची गुणात्मक टक्केवारी यंदा सर्वाधिक असून, इंद्रायणी महाविद्यालयातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या अभ्यासक्रम व परीक्षा विषयक उपक्रमामुळे हे शक्‍य झाल्याचे रामदास काकडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)