तळेगाव ढमढेरे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे आगमन

तळेगाव ढमढेरे-येथील परिसरामध्ये सोसाट्याचा वारा जोरात वाहू लागले पावासाने तुरळक हजेरी लावून विजांचा लखलखाट चालू होता. येथील मनुष्य जीवन विस्कळीत झाले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, शिवतक्रार म्हाळुंगी, सातकरवाडी, दहिवडी, उरळगाव या भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या. सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले होते. विजांचा कडकडाट ऐकून लहान मुले घरच्या आत बंद राहिली.

जूनच्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग होताच त्याचबरोबर तळेगाव ढमढेरे आणि शिक्रापूर परिसरात झपाट्याने वाढलेल्या गृहरचना, सोसायटीच्या भागात बोअरवेलची पाणी पातळी खालावल्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा केले जात आहे. एका टॅंकरला 600 ते 1000 रुपये मोजावे लागत असल्यामुळे येथील रहिवासी नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाबरोबर पावसाची सुरवात झाली. सध्या मोठ्या पावसाची शेतकऱ्यांसह सर्वांनाच ांना गरज असल्याचे दिसून येत आहे या परिसरात सकाळ पासून दुपारपर्यंत कडक ऊन होते, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ झाले सोसाट्याचा वारा आणि लखलखीत विजा चमकत होत्या. थोड्या वेळाने तुरळक पावसाने सुरवात केली. रस्त्याच्या बाजूने पाणी वाहत होते; परंतु शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठले नव्हते. पुढे होणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेत येथील शेतकरीवर्ग आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.