तळेगाव ढमढेरेत गारा बरसल्या

तळेगाव ढमढेरे- शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागासह दहिवडी, शिवतक्रार, म्हाळुंगी, निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, कासारी आदी गावांत सायंकाळी गारांसह वळीव पाऊस बरसला. यावेळी गारपिटीने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वळीवाने या भागात जोरदार हजेरी लावत रस्त्यावर पाणीच पाणी केले. शिवारात पाण्याचे तळे साचले होते. रस्त्यावर गारांचा पांढरा खच पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हा पाऊस नुकसानकारक ठरला.

आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास सोसायट्याच्या वाऱ्यासह गारपिटीने पावसास सुरूवात झाली. यावेळी गारांचा आकार मोठा होता. त्यामुळे रस्त्यावर तसेच शेतामध्ये असलेले शेतकऱ्यांना गारांचा मारा सहन करावा लागला. या पावसामुळे काही गावांत विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे पाणीपातळी खालावलेल्या विहिरी आणि कुपनलिकांना पाणीपातळी वाढण्यास हातभार लागला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. परिसरातील तरूणाईने सोशल मीडियावर या गारांच्या पावसाचा आनंद लुटला. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे थोडेफार नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.