तळेगाव ढमढेरेतील बेपत्ता युवकाचा मृतदेह रायगडला आढळला

शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील निलेश पोपट भुजबळ हा 35 वर्षीय युवक रविवारी (दि. 15) बेपत्ता झाल्याबाबत मंगळवारी (दि. 17) शिक्रापूर पोलीस ठाण्यात येथे फिर्याद देण्यात आली होती. त्याचा तपास करत असताना निलेश भुजबळ याने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह रायगड येथे मिळून आला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश भुजबळ हा मागील रविवारी दुचाकी घेऊन घरातून गेला होता; परंतु तो परत आला नाही त्यांनतर त्याच्या मोबाईलवर फोन केला असता तो फोन उचलत नव्हता, त्यामुळे निलेशचा भाऊ निखील भुजबळ याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात निलेश बेपत्ता झाल्याबाबत फिर्याद दिली होती, त्याचा तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करीत असताना शनिवारी (दि. 21) निलेशने रायगड जिल्ह्यातील एका पोलीस ठाणे हद्दीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर रायगड पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला असता त्याच्या खिशातील कागदपत्रांच्या नावावरून हा मृतदेह निलेश भुजबळ याचा असल्याचे समोर आले. तर निलेश याने आधी विषारी औषध प्राशन करून गळफास घेतला असल्याचे आढळून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)