तळेगाव ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत महिला आक्रमक

शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे गलथानपणे ग्रामपंचायतचा कारभार चालवत असून विकास कामांबाबत मागितलेली कोणतीही माहिती न देता त्यासंबंधी विचारणा करणाऱ्यांना मारहाण करण्यास प्रवृत्त करून त्यांचेवर गुन्हे दाखल केले जात आहेत. तळेगाव ग्रामपंचायतचा कारभार व ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे यांनी दिला आहे.
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या चाललेल्या विकास कामांबाबत संशय असल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विकासकामांबाबत माहिती घेतली असता व अर्ज केले असता त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या तक्रारदारांनी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत; परंतु त्यांनतर देखील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजय रोकडे यांनी झालेल्या विकासकामांची माहिती, अंदाजपत्रके, गोळा होणारा कर, मुल्यांकने अदा केलेल्या पावत्या यांसह आदी कोणत्याही प्रकारची माहिती तक्रारदारांना दिली नाही. नवीन बांधण्यात आलेले शौचालय नदीच्या कडेला बांधण्यात आलेले असून त्याचा मैला नदीपात्रात सोडून दिल्याने त्याबाबत विचारणा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याने मागितलेल्या माहितीसाठी शौचालय ठिकाणी बोलावून त्याला अर्वाच्च भाषेत बोलून त्याला शिवीगाळ करण्यास प्रवृत्त केले. कोणतीही माहिती न देता त्याला मारहाण करण्यास भाग पाडले असल्याचे चेतना ढमढेरे यांनी केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
तर यापूर्वी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी चेतना ढमढेरे यांनी केली असून अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. गावच्या विकासकामांबाबत माहिती मागणाऱ्यांचवर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत समोर बचत गटांच्या महिलांसह आमरण उपोषण करणार असल्याचे चेतना ढमढेरे यांनी सांगितले. याबाबत महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)