तळेगावात हनुमान उत्सवानिमित्त कुस्त्यांचा आखाडा

तळेगाव ढमढेरे – येथील हनुमान यात्रेच्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय लोकनाट्य तमाशाचेही आयोजन केले होते. यात्रेनिमित्त संपूर्ण बाजारपेठेतून छबिना काढण्यात आला. उत्सवानिमित्त श्रींना अभिषेक घालण्यात आला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी भव्य अशा कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता.
तळेगाव ढमढेरे येथील बाजारपेठेतून वाजतगाजत सकाळी 9 ते 12 छबिण्याचा कार्यक्रम करण्यात आला श्रींची पालखीतून मिरवणूक गावभर व पेठेतून काढण्यात आली. भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन शिक्रापूर भजनी मंडळाचे बंडूतात्या राऊत, दत्ता भोसुरे, दरेकरवाडीच्या महिला भजनी मंडळाचे पद्माताई दरेकर, टाकळी भीमाचे भजनी मंडळीचे साहेबराव काळे व कासारीचे बंडोबा नवले, माळवाडीसह परिसरातील भजनी व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती. पहिल्या दिवशी आनंद जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशा तसेच महाराष्ट्राची शान शाहीर बाळासाहेब कन्हेरे आणि रामदास गुंड यांच्यात कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भव्य कुस्त्यांचा जंगी आखाड्यात संपूर्ण जिल्ह्यातील व बाहेरच्या जिल्ह्यातून मल्ल हजर राहिले होते.
यावेळी जिल्ह्यातून तसेच कोल्हापूर भागातील 350 मल्लांची हजेरी लावली. मुलींच्या कुस्तीने आखाड्यात वेगळीच रंगत आली. पेरण्याची तेजल वाळके आणि अष्टापूरची कल्याणी कोतवाल, तसेच जातेगावची महिला पैलवान स्नेहल उमाप आणि धामारीची डफळ या मुलींनी अस्सल कुस्तीपटूचे कुस्ती शौकिनांना दर्शन दिले; तसेच इतर मुलींच्या झालेल्या कुस्त्यांचे कौतुक करण्यात आले. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. एक हजारापासून पदहा हजारांपर्यंत यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विजयी मल्लांना पन्नास ते साठ हजाराचे बक्षिसे देण्यात आली. शेवटची कुस्ती स्वप्नील शितोळे व शिरूर उपकेसरी सचिन वडघुले, तुकाराम शितोळे आणि निखील कदम यांच्यात लावण्यात आली. वैयक्तिक इनाम 10 हजारांत कुस्त्यांचा शेवट झाला. पंच म्हणून राजेंद्र ढमढेरे, विजय बंडोबा जेधे आणि राजेंद्र सुभाष ढमढेरे यांनी जबाबदारी सांभाळून आलेल्या मल्लांच्या मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आल्या. यावेळी हनुमान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरविंद ढमढेरे, माजी उपसरपंच महेंद्र पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घुमे, जिल्हा कॉंग्रेसचे नेते महेश ढमढेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली आल्हाट, खजिनदार बाळासाहेब आल्हाट, प्रफुल्ल आल्हाट, सचिन पंडित, रामभाऊ जगताप, धनंजय जगताप, अमोल घुमे, शंकरराव जगताप, अनिल ढमढेरे, सुरेश ढमढेरे, विजय घुले, हे उपस्थित होते तर मार्गदर्शक आर. एस. एसचे विभागीय प्रमुख संभाजी गवारे, सुभाष ढमढेरे, प्रभाकर ढमढेरे, पै. अनिल होळकर, पै. अविनाश गव्हाणे, उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)