तळमावले येथे आढळले मृत अर्भक, परिसरात खळबळ

File Photo

काळगाव दि. 26 (प्रतिनिधी)
तळमावले ता.पाटण येथे मुख्य बाजारपेठात 7 महिन्याचे पुरूष जातीचे अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाजारपेठेतील दुकान गाळ्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शेतामध्ये मृत स्वरूपात हे अर्भक आढळून आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तळमावळे येथील राजस्थान बेकर्सच्या पाठीमागे सायंकाळी 6 च्या सुमारास पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. ही बाब बाजूला सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी स्थानिक पोलीस पाटील विशाल कोळेकर यांना घटनेची कल्पना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनतर कोळेकर ढेबेवाडी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृत अर्भकाची पाहाणी केली. मृत अर्भक पुरूष जातीचे असून अंदाजे सात महिन्याचे असल्याचे कळते.

सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी केली होती. मृत अर्भकाचा पंचनामा करून पुढील तपासणीसाठी कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेची नोंद तळमावले पोलीस ठाण्यात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)