तलाठी मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाट

– तीन आठवडे उलटूनही आरोपी सापडेना?

वडगाव मावळ – जमीन खरेदी-विक्रीच्या फेरफार नोंदीबाबत मंडलाधिकारी यांच्याकडे सुनावणीला असलेल्या दोघांनी तलाठ्याला दमदाटी, शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याची घटना सोमाटणे (ता. मावळ) येथील तलाठी कार्यालयात या घटनेला तीन आठवडे उलटूनही आरोपी मोकाट असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजीव पुंडलिक साळवे (वय-47, रा. काशीद पार्क, पिंपळे गुरव, ता. हवेली) मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. वसंत बजाबा पापळ (रा. परंदवडी ता. मावळ) व रवींद्र गराडे (रा. धामणे ता. मावळ) अशी फरार आरोपींची नावे आहेत.

मंडलाधिकारी अजय सोनवणे यांच्याकडे सुनावणीला असलेल्या उर्से (ता. मावळ) येथील जमीन गट नंबर 519 चा जमीन खरेदी विक्रीच्या फेरफार नोंदीबाबत संबंधितांना लेखी सूचना न देता फेरफार करुन देण्यासाठी आरोपी वसंत पापळ व रवींद्र गराडे यांनी फिर्यादी तलाठी संजीव साळवे यांना दमदाटी, शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. साळवे यांना क्षणभर काय घडत आहे याची कल्पना झाली नाही. तलाठी साळवे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेवून आरोपी पापळ व गराडे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा करून दमदाटी, शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याची तक्रार दिली. गेल्या तीन आठवड्यांपासून आरोपी फरार आहेत. फिर्यादी तलाठी साळवे दैनंदिन पोलिसांकडे चौकशी करत आहेत. त्यांना आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)