तलवारीच्या धाकाने खंडणी मागणारे दोघे जेरबंद

देहूरोड – तलवार, चाकूच्या धाकात जीवे मारण्याची धमकी देत देहूरोड येथील एका स्वीट होम मालकाकडून पाच हजार रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांना गुरुवारी तासाभरात पोलिसांनी अटक केले असून न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत (दि. 30) पोलीस कोठडी ठोठावली आहे.

अविनाश महावीर भंम्बुक (वय-19, रा. किन्हई, देहूगाव), शंकर देवीदास रिडलान (वय-31, रा इंद्रधाम सोसायटी, विकासनगर, किवळे) अशी अटक केलेल्या दोघाची नावे आहेत. कपिल दिनदयाल मित्तल (वय-35, रा. धनश्री निवास, आंबेडकर रोड, देहुरोड, पुणे) यांनी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.24) रात्री साडेअकराच्या सुमारास भंम्बुक व रिडलान याने तलवारीसारखे हत्यार व चाकू घेऊन मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल संतोष स्वीट होममध्ये प्रवेश केला. फिर्यादी कपिल मित्तल याच्याकडून पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुला जीवे मारून टाकतो, अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केली होती.

पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, तपासी पोलीस नाईक प्रमोद उगले यांनी दोघांना एका तासात अटक केले. भंम्बुक यावर मारामारी, दहशत माजविणे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून रिडलान हा इंद्रधाम सोसायटीत सुरक्षा रक्षकाचे काम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)