…तर 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन

मराठा समाजाचा सरकारला अल्टिमेटम
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेचे आवाहन केलेले असले तरी त्यांच्यासोबतच्या चर्चेला सकल मराठा समाजाच्या वतीने कोणताही नेता, समन्वयक चर्चेला जाणार नाही, असा इशारा देतानाच बंद दरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… आदी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात येईल, असा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाची बैठक शिवाजी मंदिर नाटयगृह येथे पार पडली. या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले आहेत. 25 जुलै बंद दरम्यान दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिका-यांची चौकशी करण्यात यावी व त्यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे. मुख्यमंत्री व महसुलमंत्री यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलुन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंद दरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा, आदी ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदोलकांमध्ये फूट पाडू नये. जे चर्चेला जातील त्यांना समाज धडा शिकवेल असाही ठराव संमत करण्यात आला आहे. दोन दिवसांत जर सरकारने या मागण्यांबाबत कारवाई केली नाही तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात येईल. पुढच्या आंदोलनासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे, असे आवाहनही सकल मराठा समाज महामुंबईच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)