…तर मोदींनी शेतकऱ्यांच्याच जमिनी लाटल्या असत्या: राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली: दिल्लीतील रामलीला मैदानातील जनआक्रोश रॅलीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप-संघावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष देशातील शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला नसता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जमिनी लाटल्या असत्या, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच शेतकऱ्यांचे हित साधू शकते, असंही ते म्हणाले.

काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारविरोधात आज नवी दिल्लीतील रामलीला मैदानात जनआक्रोश रॅली काढून आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. २०१९ मध्ये देशात काँग्रेसचीच सत्ता येईल. त्यावेळी सर्वांना काँग्रेसची ताकद दिसेल, असा विश्वास राहुल यांनी यावेळी व्यक्त केला. मी देशातील जनतेशी संवाद साधतो. मोदी सरकारच्या कारभारावर खूश आहात का असा प्रश्न मी त्यांना विचारतो. त्यावेळी ते खूश नसल्याचे सांगतात. देशातील जनता मोदी सरकारवर नाराज आहेत, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)