…तर तुम्हीच सांगा मोदीजी तुम्हाला कोणत्या चौकात शिक्षा द्यावी – राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: देशामध्ये काळ्या पैश्यांच्याविरोधात मोठा गाजावाजा करत राबवण्यात आलेल्या नोटाबंदीच्या यशावर रिजर्व बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिजर्व बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनबाह्य केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९९. ३% नोटा रिजर्व बँकेकडे जमा झाल्या आहेत.

आवाहालानुसार, १५. ४१ लाख कोटी रुपये हे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून भारतीय चलनात होते. त्यातील १५. ३१ लक्ष कोटी रुपयाच्या किमतीच्या नोटा रिजर्व बँकेकडे जमा झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“नोटांवरील प्रक्रिया आणि विशिष्ठ बँकांकडून जमा झालेल्या नोटांची पडताळणी करण्याचे प्रचंड मोठे कार्य पूर्ण झाले” , असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

आरबीआयचा अहवाल जारी झाल्यानंतर इतर विरोधी पक्षांनीही नोटाबंदीवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवर नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडियो शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी यशस्वी होण्यासाठी ५० दिवस मांगितले होते. नाहीतर मला कुठेही शिक्षा द्या!, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, “मोदीजी आपण ५० दिवस मांगितले होते. आता २ वर्ष पूर्ण झाले. आतंकवाद बंद नाही झाला, ना काळा पैसे परत आला. तर तुम्हीच सांगा मोदीजी कोणता चौकआम्ही निवडू आणि तुम्हाला शिक्षा देऊ”

https://twitter.com/nawabmalikncp/status/1035222007460388864

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)