तर कधीच मराठा आरक्षण दिले असते – पंकजा मुंडे

बीड – “माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. पण हे प्रकरण कोर्टात असल्याने विलंब होत आहे, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, ती फाईल ना माझ्या टेबलवर आहे, ना मुख्यमंत्र्यांच्या, हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे विलंब होत आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांनी बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंकजा म्हणाल्या, तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला वाकायला सांगणार नाही. मी तुमची दूत बनणार आहे. तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत जाणार आहे. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते की जर माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर मी क्षणाचा विलंब न करता आरक्षण दिले असते.

“आज मी तुम्हाला एक शपथ देण्यासाठी आले आहे. जीव गमावू नका.. माझ्या वाघांनो जीव देऊ नका, असे त्या म्हणाल्या. तसेच, आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे आश्वासनही पंकजा मुंडेंनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)