..तर आम्हीही राजीनामा देऊ : हसन मुश्रीफ

कोल्हापूर – मराठा आरक्षणाचा प्रश्न आमदारांच्या राजीनाम्याने सुटणार असेल तर आमचीही तयारी आहे. परंतु मुख्य प्रश्न हा तत्काळ आरक्षण देण्याचा आहे. त्यामुळे ते तातडीने देण्याची गरज आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक आंदोलन चार दिवसांपासून सुरू आहे. या ठोक आंदोलनात रोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून सरकारचा निषेध केला जात आहे. मराठा कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत मुंडण आंदोलन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने आरक्षण दिले नाही तर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत उदय लाड, नंदकुमार सुतार, गणेश सुतार यांनी मुंडण करून घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)