…तर अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल : इराण

तेहरान : अणु कराराच्या मुद्द्यावर इराणने अमेरिकेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अणु करारामधून अमेरिकेने माघार घेतल्यास त्याच्या गंभीर परिणामांना अमेरिकेला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा इराणने दिला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात अणुकरार झाला आहे. मात्र हा करार मोडण्याचे प्रयत्न अमेरिकेने चालवले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत वैर निर्माण झाले आहे.

इराणमधील एका सभेमध्ये भाषण करत असताना रुहानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली.

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी हा इशारा दिला असून अमेरिका आणि फ्रान्सच्या प्रत्येक खेळीला उत्तर देण्यास इराण सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केल्याचे काय परिणाम भोगावे लागतात, हे मात्र ट्रम्प यांना माहित नाही, असे रुहानी म्हणाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)