तरुण तेजपालविरोधातील खटल्याला ९ मेपर्यंत स्थगिती

पणजी: पत्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल याला कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने तरुण तेजपालची याचिका फेटाळली होती. त्यानंतर तेजपाल याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून, 9 मेपर्यंत या खटल्यावर सुनावणीस स्थगित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात तेजपालच्या याचिकेवरील सुनावणी 12 डिसेंबर 2017ला पूर्ण झाली होती. न्या. नूतन सरदेसाई यांनी निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने तेजपालच्या विरोधात निर्णय दिला होता. आरोपपत्र रद्द करण्याची त्याची मागणी फेटाळण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)