तरुणीवर वर्षभर बलात्कार; एकावर गुन्हा

राजगुरूनगर- लग्नाचे आमिष दाखवून 22 वर्षीय तरुणीवर वर्षेभर बलात्कार केल्याची घटना खेड तालुक्‍यात घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने राजगुरूनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
योगेश बजरंग डवणे (रा. नायफड, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही खेड तालुक्‍याच्या प्रश्‍चिम भागात राहत आहे. एक वर्षापूर्वी पीडितेचे व योगेश यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षाभरात खेड येथील एका लॉजवर नेऊन जुलै 2017 ते 4 जून 2018 या कालावधीत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. पीडितेने लग्नाची मागणी केली असता आरोपी योगेश म्हणाला की, मी एका मुलीशी रजिस्टर लग्न केले आहे. मी तुझ्याशी लग्न करणार नाही तुला काय करायचे ते कर असे सांगितले. त्यानंतरही सतत लग्नासाठी विचारणा करुनही आरोपीने लग्नाला नकार दिल्याने अखेर पीडितेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)