तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर – संगमनेर तालुक्यतील व आश्वी बुद्रूक येथील शुभांगी अशोक शिंदे ( वय २२ ) हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रूक येथील अशोक माधव शिंदे यांची मुलगी शुभांगी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून ती मनोविकाराने त्रस्त झाल्याने, तिच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी ती घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. बराच वेळ ती खाली न आल्याने, वर जाऊन पाहिले असता, ओढणीने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळली.

या बाबत अशोक शिंदे ( वय 50 ) यांनी आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस नाईक संजय लाटे पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)