तरुणाचा आत्महत्येचा इशारा

पिंपरी – मराठा आरक्षाणा संदर्भात थेरगाव येथील तीन तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
याप्रकरणी तरुणाने पोलिस यंत्रणेस व जिल्हाधिकारी कार्यालयास ही निवेदन दिले आहे. सतिश काळे यांनी हे निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की आरक्षणासाठी बलिदान देणारे काकासाहेब शिंदे व इतर तरुणांना तातडीने 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे अशी मागणी निदेनात केली असून मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरुन काळे व इतर दहा जणांनी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)