तरुणाईसाठी संगीत नाटकाचे नवे रुप

4- 5 तास चालणारे संगीत नाटक आता अवघ्या 2 तासात होणार

पुणे- नाट्य क्षेत्रात संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे एक खास आणि वेगळे वैशिष्ट्य आहे. ती मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली एक श्रेष्ठ देणगी आहे. नाट्यसंगीत हा मराठी रंगभूमीवरून विकसित झालेला एक खास गानप्रकार आहे. मराठी रसिक जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी संगीत नाटकाचे, नाटयसंगीताचे वेड बरोबर घेऊनच वावरत असतो. असे हे संगीत नाटक काळानुसार बदलत पुन्हा नव्या रुपात आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या आधुनिक आणि धावपळीच्या काळात वेळ हा बहुमुल्य झाला आहे.

त्यामुळे एक नाटक पाहण्यासाठी 4 ते 5 तास बसणे हे आजच्या प्रेक्षकांच्या दृष्टीने शक्‍य नसल्याने पूर्वी 3 ते 4 तास चालणारे हे नाटक आता 2 तासात होणार आहे. संगीत नाटकाची लोकप्रियता आणि सध्याच्या प्रेक्षकांचा वेळ लक्षात घेता संगीत नाटकाचा वेळ कमी कारण्याचे ठरविले आहे. असे संगीत नट्यभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांनी सांगितले आहे.

मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी संगीत रंगभूमी याची प्रतिमा मोठी आहे. पूर्वी रात्रभर नाटक चालायचे. मात्र, आता रसिकांना इतका वेळ थांबणे शक्‍य होत नाही. त्यामुळेच कमी कालावधीत संगीत नाटक तयार करण्यात आले आहे. वेळ जरी कमी केला असला तरी नाटकातील मुख्य आशयाला धक्‍का लावलेला नाही. नाटकातील शास्त्रीय संगीतापासून ते लावणीतही कोणतीच कटछाट केलेली नाही. पूर्वीच्या नाटकातील उपकथानक काढून टाकून वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.
– किर्ती शिलेदार, अध्यक्षा, अखिल भारतीय नाट्य संमेलन.


बदलत्या काळानुसार संगीत नाटक दोन तासात आल्याने तरुण प्रेक्षक त्याकडे नक्किच आकृष्ट होईल. आणि नवोदित कलाकारही काळानुरुप कलाकृती घेउन संगीत नटकात सहभागी होतील
मकरंद टील्लू- संयुक्त कार्यवाह, नाट्य परिषद पुणे


काळ बदलेला आहे 4 तास बसण्याची प्रेशकांची तयारी नसते.
त्यामुळे काळानुसार 2 तसाची रंगावती सादर केल्याने प्रेक्षकांचा कल वाढेल.
दिप्ती भोगले.. नाट्यपरिषद सदस्य


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)