… तरीही भारताचा वेगवान मारा पुरेसा प्रभावी

भुवनेश्‍वरच्या अनुपस्थितीत भारताचा फिरकी माराही विजय मिळवून देण्यास सक्षम

माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफचा इशारा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बर्मिंगहॅम: भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या अव्वल गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही भारताकडे पुरेसा सक्षम वेगवान मारा आहे, असे मत इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ याने व्यक्‍त केले आहे. तसेच कसोटी मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता भारताच्या फिरकी माऱ्यातही असल्याचा दावा त्याने केला. भारत व इंग्लंड या संघांमधील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला बुधवारी प्रारंभ होत आहे.

भारतीय संघ एकाच गोलंदाजावर अवलंबून नाही. सुरुवातीच्या काळात भारतीय संघ केवळ कुंबळे, श्रीनाथ आणि नंतर झहीर खान यांच्यावर अवलंबून असायचा. मात्र आता भारतीय संघात तशी परिस्थिती राहिलेली नाही. भारताकडे वैविध्यपूर्ण क्षमतेचे वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहेत. इतकेच नव्हे तर कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी भारताचे गोलंदाज सज्ज आहेत, असे सांगून गॉफ म्हणाला की, भुवीकडे स्विंग आहे, बुमराह चेंडू स्किड करण्यात तरबेज आहे. आता उमेश यादव नव्या चेंडूला हवेत आणि खेळपट्टीवरून वळवू शकतो. शमीकडे चांगला वेग असून, ईशांत शर्माकडे अनुभव आणि आक्रमकता असल्यामुळे भारताचा मारा कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी ठरतो.

वेगवान आणि फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत कर्णधार विराट कोहलीकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही खेळपट्टयांवर भारताचा गोलंदाजीचा मारा प्रभाव दाखवू शकेल, असेही सांगून गॉफ म्हणाला की, भुवनेश्वर कसोटी मालिकेत न खेळणे, हा भारतासाठी मोठा धक्‍का आहे यात शंका नाही. दुखापतीमुळे तो एकदिवसीय मालिकेत अपेक्षित कामगिरी बजावू शकला नव्हता. त्यातच पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी काही प्रमाणात दुबळी झाली असल्याचे बोलले जात आहे. परंतु भुवनेश्‍वरच्या गैरहजेरीतही भारताला पराभूत करणे सोपे नाही. त्याची जागा भरून काढण्यासाठी अन्य दर्जेदार गोलंदाज भारताकडे आहेत.

भारताला नमवायचे असल्यास प्रतिस्पर्धी संघाला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागते, असे सांगून गॉफ म्हणाला की, भारताकडे तीन अव्वल दर्जाचे स्पिनर आहेत. रविचंद्रन अश्‍विनला भारतातील परिस्थितीमध्ये खेळणे कठीण आहे. इंग्लंडमध्ये तो तितका प्रभावी ठरलेला नसला, तरी त्याचा अनुभव मोलाचा ठरू शकतो. रवींद्र जडेजा कोणत्याही खेळपट्टीवर बळी घेण्यास सक्षम आहे. तर कुलदीप यादवने इंग्लंडमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे कोणत्या स्पिनरला संघात स्थान द्यायचे यासाठी भारतीय संघव्यवस्थापनासमोर मोठे आव्हान असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)