तमन्ना भाटिया लग्नाच्या तयारीत नाही

तमन्ना भाटिया अमेरिकेतल्या एका डॉक्‍टरबरोबर लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. ही बातमी नक्की खरी आहे की नाही. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. स्वतः तमन्ना भाटियाने स्पष्टिकरण दिले आहे. “मी सिंगल आहे, आणि मी त्यामध्ये आनंदी आहे. माझ्यासाठी माझे घरचे कोणताही मुलगा बघत नाहीत.’ तमन्ना भाटियाने “बाहुबली-2′,”हिम्मतवाला’ आणि “रेबेल’सारख्या सिनेमांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आपले नाव सारखे कोणाबरोबर तरी जोडले जात असते. कधी कोणी ऍक्‍टर, मग क्रिकेटर आणि एखाद्या डॉक्‍टरबरोबर लग्न होणार आसल्याची अफवा उठत असते. या बातम्या ऐकल्या की आपण शॉपिंग मॉलमध्ये नवरा खरेदीला निघाल्याचा फील येतो, असे गंमतीने तमन्ना म्हणाली. या अफवा कोण पसरवते आणि का पसरवते, ते लक्षात येत नाही. सध्यातरी आपल्याला आपल्या करिअरवर प्रेम जडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेच निभावण्याचा प्रयत्न करत आहे. लग्न तर आता आपल्या प्रायरॉरिटी लीस्टमध्येच नसल्याचे तिने सांगितले. जेंव्हा ठरेल तेंव्हा मिडीयावाल्यांना नक्की सांगितले जाईल. तोपर्यंत तमन्नाच्या लग्नाच्या विषयाला थांबवले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)