तब्बल सतरा वर्षानंतर आई व मुलाची झाली भेट

प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना आले यश
नेवासा – लग्नात हरवलेल्या नवनाथ कचरू वालेकर हा मनोरुग्ण तब्बल सतरा वर्षानंतर आपल्या आईला भेटला. नागपूर शहरात फिरतांना आढळून आला. प्रहार संघटनेच्या नागपूर, नगरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आई व मुलाची भेट झाली. व्हॉट्‌सअपवर नवनाथचा फोटो टाकण्यात आला होता. तोच नवनाथ असल्याची ओळख सोनईत असलेल्या त्यांच्या मित्राला पटल्यानंतर नागपूरमध्ये असलेल्या त्यांच्या आईला नवनाथची माहिती दिल्यानंतर सोनईत आज त्यांची भेट झाली.
नेवासे तालुक्‍यातील सोनई येथील नवनाथ कचरू वालेकर हा मनोरुग्ण मुलगा नगर येथील एका लग्नसमारंभात पंधरा वर्षांचा असताना बेपत्ता झाला होता. त्याच्या घरी आई आणि एक भाऊ आहे. भाऊही मनोरुग्ण आहे. नवनाथची आई गजराबाई कचरू वालेकर यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. तेव्हा तो कुठेच सापडला नाही, तेव्हा तो कन्नड शहरात मनोरुग्ण म्हणून फिरत होता. आईने त्याच्या शोधासाठी जिवाचे रान केले होते. इतकेच नव्हे तर मुळगाव सोनई गाव सोडले होते. सावनेर नागपुर येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या टीमने पुढाकार घेतला.अखेर एका प्रहारच्या कार्यकर्त्यांची नजर नवनाथवर पडली. त्याची चौकशी केली. सर्व मित्र व यंत्रणा कामाला लागली. नवनाथची अवस्था फार वाईट होती. अंगावर कपडे नव्हते, दाढी वाढलेली होती, पायाला मोठी जखमा झालेल्या होत्या. तो खूप अशक्त झालेला होता.त्याला दवाखान्यांमध्ये नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. त्याची दाढी केस कटिंग करण्यात आली.
नवीन कपडे परिधान करण्यात आले. त्याला खूप विचारले असता तो काही बोलत नव्हता. पण कागद आणि पेन दिल्यानंतर नवनाथने आपले पूर्ण नाव नगर जिल्ह्याचे नाव लिहिले. नगर जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांना नागपूरचे प्रहार कार्यकर्ते हितेश बनसोडे यांनी फोनवरून नवनाथची माहिती दिली. त्यानंतर पोटे यांनी पोलिसांची मदत घेतली पण पोलिसांना यश आले नाही. मग फेसबुक, व्हाट्‌सअपच्या माध्यमातून शोध सुरू केला. फेसबुकवरील पोस्ट सोनईतील गणेश जाधव या तरुणांनी बघितली. त्यांनी फेसबुकवरून नवनाथ ओळखत असल्याचे सांगताच नवनाथचा घराचा शोध घेतला असता असे समजले की वडील मरण पावले त्यानंतर काही वर्षांनी आईने सोनई गाव सोडले होते.
आता प्रश्न पडला होता. आईचा शोध कसा घ्यायचा ग्रामपंचायतमध्ये संपर्क केला. यामध्ये पंधरा दिवस निघून गेले. त्यानंतर आईचा पत्ता मिळाला. नवनाथ संपर्कात होता. नागपूर येथून हितेश बनसोड यांना नवनाथला घेऊन येण्यास सांगितले रेल्वेने आणण्यात आले. ग्रामपंचायत येथे भेट घडवण्याचे ठरले. आई दुपारी आल्यानंतर त्यांनी नवनाथला बघताच ओळखले. त्यांच्या दोघांची गळाभेट बघता उपस्थित सर्व सोनई ग्रामस्थांना गहिवरून आले.
सोनई ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व हितेश बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. पोटे म्हणाले प्रहारचे नाते ही सर्वसामान्यांच्या वेदनेशी व दुःखाशी आहे. याची प्रचिती आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या पक्षात काम करताना मला आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)