पुणे : तथाकथित मट्ट्या भाईचा धिंगाणा…

पुणे – पार्टीसाठी तोंडओळखीच्या तरुणाने पाच हजार दिले नाहीत म्हणून त्याच्यावर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करण्यात आला. तसेच आपण परिसरातील भाई असल्याचे सांगत हवेत कोयता फिरवत एकाने नाना पेठेत दहशत पसरवली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत उर्फ मट्ट्या (रा. राजेवाडी, नानापेठ) याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुशांत मोरे (22, रा.नानापेठ) हे त्यांच्या मित्रासह राहत्या घराच्या इमारतीबाहेर बोलत थांबले होते. यावेळी होंडा ऍक्‍टिव्हावर मट्ट्या व त्याचा एक साथीदार तेथे आला. त्याने फिर्यादीला कोयता दाखवत धमकी देऊन त्याचा मित्र “बबऱ्या कुठे आहे’ अशी विचारणा केली. यावर फिर्यादीने “तो तुझाच मित्र आहे, तुला त्याचे घर माहिती आहे, तुच घरी जाऊन बघ’ असे उत्तर दिले. यामुळे चिडलेल्या मट्ट्याने “बबऱ्या नाहीतर तुच आम्हाला पार्टीसाठी पाच हजार रुपये दे’. मात्र फिर्यादीने नकार देताच त्याने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीच्या दिशेने भिरकावला, मात्र फिर्यादीने ब्लॉक हुकवला. यामुळे मट्ट्याने चिडून आरडाओरडा करत “मीच येथील मट्ट्याभाई आहे’ असे म्हणत दहशत पसरवली. तसेच कोयता फिरवत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मट्ट्या साथीदारासह पळून गेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी. आर. शिकलगार तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)