तडजोड करण्याची भूमिका हाच सुखी संसाराचा मूलमंत्र – डॉ सुनिल गंधे 

नगर – संसार हा दोन जीवांचाच नव्हे तर दोन संस्कृतीचा गाडा आहे, तो यशस्वी पणे चालविणे हे काम जगन्नाथाचा रथ ओढण्यापेक्षाही अवघड काम आहे .
दोन पावले मागे सरकत तडजोड करण्याची भूमिका हाच सुखी संसाराचा मूलमंत्र आहे असे स्पष्ट मत डॉ सुनिल गंधे यांनी मांडले.
अहमदनगर येथील नक्षत्र लॉन येथे आयोजित मोफत संसार प्रशिक्षण शिबिरात नव विवाहित जोडप्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
चार दिवस चालणाऱ्या या जगातील पहिल्या संसार प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सकाळी सात वाजता योग शांतीपाठाने व पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ सुनिल गंधे यांचे सह सुनील फुलसौंदर, अविनाश ठोकळ, डॉ रत्नाकर जोशी, नरेंद्र निंबाळकर, डॉ नेहा बोरा, दगडे, श्रीमती एम एच कोतकर, अश्विनी काळे, गौरी राठोड, उत्तम सुंबे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात नाशिक, बार्शी, सोलापूर सह नगर जिल्ह्यातील अनेक नवविवाहित जोडप्यांनी सहभाग नोंदवला
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ सुनिल गंधे पुढे म्हणाले सर्व जण व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपापल्या व्यवसायात प्रगती साधतात, परंतु संसाराचे प्रशिक्षण न मिळाल्याने हेच यशस्वी व्यावसायिक तथा नोकरदार संसारात मात्र अपयशी ठरतात, संसारी माणसाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येक वेळी आपलेच म्हणणे खरे न म्हणता दुसऱ्याचेही मत विचारात घेतले पाहिजे संसारात नाती जपण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागते पण ती जपता आल्याचा आनंद वेगळाच असतो या शिबिरात संसाराविषयी अनेक विषयांवर चर्चा व विचार मंथन केले जाणार असल्याचे डॉ सुनिल गंधे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)