ड्रेसिंग रूममधील सकारात्मकता निर्णायक 

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील सकारात्मक वातावरण खूपच महत्त्वाचे ठरते, असे सांगून पंत म्हणाला की, ही सकारात्मकता जणूकाही संसर्गजन्य आहे. तुमच्या मनात जी काही नकारात्मक भावना असेल, ती तेथे गेल्यावर पळून जाते. प्रत्येक खेळाडू दुसऱ्याला मदत करण्यासाठी उत्सुक असतो. त्यामुळे तुम्हाला अपयशाचीही भीती वाटत नाही. मर्यादित षटकांच्या संघात निवड न झाल्याबद्दल पंत म्हणाला की, मला नेहमीच भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती. किंबहुना कोणत्याही खेळाडूचे अंतिम ध्येय कसोटी संघ हेच असणार.

माझे तर ते स्वप्नच होते. हे स्वप्न इतक्‍या लवकर पूर्ण व्हावे, ही भावना विलक्षण आहे. माझे कुटुंबीय आणि प्रशिक्षक तारक सिन्हा यांना मी या वाटचालीचे श्रेय देऊ इच्छितो. भारताच्या कसोटी संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न बालपणापासूनच त्यांनी माझ्या मनात रुजविले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)