“ड्रॅगन फ्रुट’ला दरवाढीचा “ताप’

पिंपरी – डेंग्यूमुळे पेशी घटल्यानंतर त्यावर गुणकारी असलेल्या किवी आणि ड्रॅगन फ्रुटला बाजारपेठेत मागणी वाढली आहे. परंतु, ड्रॅगन फ्रुटची आवक 90 टक्के घटल्याने ठराविक ठिकाणीच ड्रॅगन फ्रुट बघायला मिळत आहेत. त्यामुळे त्याचे दर कमालीचे वाढले आहेत.

किवी, ड्रॅगन फ्रूट डेंग्यूबरोबरच “स्वाईन फ्लू’वर गुणकारी मानले जाते. किवीची आवक चांगली आहे. किवीचे एक पॅकेट बाजारात 60 रूपयाला मिळत आहे. यामध्ये किवीचे तीन नग पॅकेटमध्ये मिळतात. किवीची आवक परदेशातून होत आहे. चिली, इटली आणि न्युझीलंड या देशांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती विक्रेते मनोज मुलानी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या महिन्यात ड्रॅगन फ्रुटचे दर 100 रूपये किलो होते. त्यांची आवक तेव्हा मोठ्या प्रमाणात होती. परंतु, तेव्हा ग्राहक नसल्याने विक्रेत्यांना फ्रुट अक्षरशः फेकून द्यायला लागले होते. त्यामुळे विक्रेत्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. यामुळे विक्रेत्यांनी ड्रॅगन फ्रुटची खरेदी थांबवली होती. शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यावर गुणकारी म्हणून डॉक्‍टरांनी सुद्धा ड्रॅगन फ्रुट आणि किवी फळ खाण्याचा सल्ला दिल्याने या फळांना मागणी वाढली आहे. मात्र, ड्रॅगन फ्रुटची आवक घटल्याने त्याचे भाव 600 रूपये किलो झाले आहे. आधी परेदशातून या फळाची आवक मोठ्या प्रमाणात होत असे. आता महाराष्ट्रातही त्याचे उत्पादन होत असल्याने परदेशातून येणारी आवक थांबली आहे. सांगली येथून ड्रॅगन फ्रुट बाजारपेठेत येतात. मात्र, त्याची आवक घटली असल्याची माहिती विक्रेते कुमार शिरसाठ यांनी दिली.

“ड्रॅगन फ्रुट’ कशासाठी?
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूवर गुणकारी असलेले ड्रॅगन फ्रुट इतर आजारावरही गुणकारी आहे. शरिरातील पेशी कमी झाल्यावर फळ खाल्ल्यास पेशी वाढण्यास मदत होते. तसेच मधुमेहावर हे फळ गुणकारी आहे. शरिरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ड्रॅगन फ्रुट आहे. बहुगुणी असल्याने नागरिकांची या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती, विक्रेते कुमार शिरसाठ यांनी दिली.

ड्रॅगन फ्रुटची आवक पुण्याच्या बाजारात घटल्याने ते मिळणे कठीण झाले आहे. तसेच त्याचे भाव वधारले असल्याने ग्राहक आले नाही तर फ्रुट फेकून द्यायला लागतील. यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसारच फ्रुट मागवण्यात येत आहे. किवी उपलब्ध असून त्याला चांगली मागणी आहे. त्याचे भाव आवाक्‍यात असल्याने त्याचा खप वाढला आहे.
– मनोज मुलानी, फळ विक्रेता, पिंपरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)