डोळासणेत “एसबीआय ‘ चेव्यवहार पाच दिवसांपासून बंद

सेंट्रल बॅंकेच्या शाखेत कामकाजासाठी व्ही पॅट प्रणाली वापरली जाते. या प्रणालीच्या कनेक्‍टिव्हीटीची अडचण असल्याने, तांत्रिक अडचणींमुळेग्राहकांना वेळेवर सेवा देता येत नाही. याबाबत वरिष्ठांना सांगितले आहे. – माधवी सोमण, शाखाधिकारी.

आर्थिक चणचणीमुळेग्राहक त्रस्त, कनेक्‍टीव्हीटीची अडचण

संगमनेर – तालुक्‍यातील डोळासणे येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडीयाचे आर्थिक व्यवहार शुक्रवार पासून बंद आहेत. त्यातच बुधवारपासून बॅंक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप असल्यानेग्रामीण भागातील ग्राहकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पठार भागातील डोळासणे, कर्जुले पठार, गुंजाळवाडी, पोखरी बाळेश्‍वर, सारोळे पठार, ढोरवाडी, जवळे बाळेश्‍वर, मामेखेल, महालवाडी, टाळूचीवाडी, सावरगाव घुले, आमलेवाडी, माळेगाव पठार, माहुली, नांदूर खंदरमाळ, धुमाळवाडी, पिंपळगाव देपा अशी सुमारे23 गावेया बॅंकेशी आर्थिक व्यवहारासाठी जोडलेली आहेत. परिसरातील शेतकरी व इतर ग्राहकांना ही बॅंक सोयीची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपासून बॅंकेचे आर्थिक व्यवहार बंद असल्याने ग्राहक त्रस्त झालेआहेत. चौथा शनिवार व रविवारची दोन दिवसांची सुट्टी होती. सोमवार, मंगळवारी सर्व्हर डाऊन झाले. बुधवारपासून दोन दिवसांचा संप असल्यानेग्राहकांची आर्थिक चणचण वाढणार आहे.
मंगळवारी दिवसभर 20 ते25 ग्राहक कामकाज सुरु होण्याची वाट पाहून सायंकाळी पाच वाजता कंटाळून घरी गेले. यातील काहींना औषधे, कृषी साहित्य व इतर खर्चासाठी पैशांची आवश्‍यकता होती. दहा टक्के व्याजदराने पैसे उसनवार घेण्याचीही त्यांची तयारी होती. अनेकदा वीज नसणे, बॅटरी बॅकअप संपणे, कनेक्‍टिव्हीटी नसणे, कधी पुरेशी रक्कम नसणेअशा अनेक कारणांमुळे बॅंकेचेकामकाज बऱ्याचवेळा बंद असते.

संदीप भागवत या शेतकऱ्याला ट्रॅक्‍टरच्या कर्जापोटी 55 हजार रुपयांची एनएफटी करण्यासाठी शेवटी 30 किलोमीटर अंतरावरील घुलेवाडीच्या शाखेत जावे लागले. त्यांनी शाखाधिकारी माधवी सोमण यांच्याकडून मुख्य व्यवस्थापक ( औरंगाबाद ) शेंडगे यांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला. त्यावेळी ही जबाबदारी शाखाधिकाऱ्यांची आहे. ग्राहकांना आमच्याशी थेट बोलता येत नाही, असेउत्तर त्यांना मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)