डोळस दुनियेत दृष्टीहिन सरगरला मिळाला न्याय

क्रांतीसूर्य संघटनेच्या रेट्यामुळे जागेचा ताबा मिळाला

कुरवली- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील अंध विजय नामदेव सरगर यांनी 2000 साली दोन गुंठे जागा खरेदी केली होती. मूळ मालकाने उरलेली जागा सन 2010 मध्ये 10 गुंठे जागा दुसऱ्या व्यक्‍तीला विकण्यात आली होती. संबंधित जागेसंदर्भात मागील दहा वर्षांपासून वाद सुरू होता. अनेकदा गाव पुढारी यांनी मध्यस्थी करून देखील अंध सरगर यांना जागेचा ताबा घेण्यासाठी अडचण येत होती. याबद्दल क्रांत सूर्य संघटनाचे गोरख खंडागळे, मधुकर कदम, घनश्‍याम निंबाळकर, बाबासाहेब सांवत यांनी पुढाकार घेत मूळ मालक व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून तातडीने संबंधीत जागेची मोजणी करून सरगर यांना दोन गुंठे जागा ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू केली.

क्रांतीसूर्य संघटनेच्या सहकार्याने दहा वर्ष प्रलंबित असणाऱ्या अडचणीची सोडवणूक अवघ्या पाच दिवसांत झाल्याने व सामोपचाराने वाद मिटल्याने सरगर यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.