डोबिंवलीत लोकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू

डोबिंवली,  – लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी डोबिंवलीजवळच्या कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडली. यात तीन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुमिता धनराज वंजारे (62), प्रीती उदय राणे (26) आणि निलेश उदय राणे (2) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण कोपरला येथील रहिवाशी आहेत. हे सर्वजण रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमावरून परत येताना रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक एकाच वेळी फास्ट ट्रॅकवर दोन्ही बाजूंनी गाड्या आल्याने या सर्वांचा गोंधळ उडाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी गोंधळलेले हे सर्वजण दोन ट्रॅकच्या मधोमध थांबले. मात्र लोकल बाजूने जात असताना एका लोकलला सुमिता यांची साडी अडकली आणि त्यांच्यासोबत प्रीती राणे आणि दोन वर्षीय मुलाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले अन्य एक जण गंभीर जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)