डोकलाममध्ये चीनच्या हालचाली सुरूच

वॉशिंग्टन – डोकलाम भागामध्ये चीनने आपल्या हालचाली संथगतीने पुन्हा एकदा सुरू केल्या आहेत. भूतान किंवा भारताकडून या कृत्याला अटकाव केला नसल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. या अधिकाऱ्याने चीनने डोकलाम भागात सुरू केलेल्या कामाची तुलना वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातील घुसखोरीशी केली आहे.

भारताकडून उत्तर सीमांचे संरक्षण करण्याचे विश्‍लेषण व्हायला हवे. कारण हा विषय भारतासाठी चिंतेचा असू शकतो, असे अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागासाठीचे मुख्य सहमंत्री अलाईस जी. वेल्स यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये चीनबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताबरोबर अमेरिकेची संरक्षण भागीदारी आहे. भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून सातत्याने संघर्षाची स्थिती असते. डोकलाम पठारावर दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने उभे ठाकले होते. अशा स्थितीत चीनच्या हालचालींची दखल भारत आणि भूतानला करून देणे गरजेचे असल्याचे वेल्स यांनी सांगितले.

संरक्षण भागीदारीमध्ये अमेरिका 850 अब्ज डॉलरची थेट प्रत्यक्ष गुंतवणूक करत आहे. अमेरिकेने चीनबरोबर स्पर्धा करता कामा नये. पण समविचारी देशांना एकत्र करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असे स्पष्टिकरणही वेल्स यांनी दिले आहे.

संपूर्ण दक्षिण चीन समुद्रामधील चीनच्या दाव्याच्या विरोधात व्हिएतनाम, मलेशिया, फिलीपाईन्स, ब्रुनेई आणि तैवान या स्वायत्त देशांनीही दावे केले आहेत. दक्षिण चीन समुद्राबरोबरच पूर्व चीन समुद्रातही चीनने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनने या समुद्रामधील काही बेटांवर आपले लष्करी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या दोन्ही भागांमध्ये खनिज, तेल आणि अन्य नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. तसेच जागतिक व्यापाराच्या दृष्टीनेही हे सागरी मार्ग महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)