डॉ. तनपुरे कारखान्याकडून 5 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग 

अध्यक्ष उदयसिंह पाटील यांची माहिती : सभासदांच्या
राहुरी – डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 2017-18 गळीत हंगामातील 1 ते 15 मार्च या पंधरवड्यात गळीत झालेल्या उसाचे 2 हजार रुपये प्रति मे. टन याप्रमाणे साधारण 5 कोटी 70 लाख रुपये पेमेंट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आमचे नेते डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू करून आपला शब्द खरा केला. सुरुवातीपासून अनंत अडचणींचा सामना करत जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यावर आम्ही भर दिला. सभासद कामगार ऊस उत्पादकांच्या भरीव सहकार्याने 2 लाख 20 हजारापर्यंत गाळपाचा टप्पा ओलांडता आला. ऊस उत्पादक सभासदांनी आमच्यावर विश्‍वास दाखवत आपला ऊस कारखान्याला दिला. संचालक मंडळानेही या उसाच्या पेमेंटसाठी व लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न केले. गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच आम्ही पेमेंटच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी अनूकुल हवामानाने साखर उताराही चांगला मिळाला मात्र साखरेच्या भावात दिवसेंदिवस मोठी घसरण होत असल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढत नि उत्पादक सभासदांना दिलेल्या शब्दाप्रमाणे 1 ते 15 मार्च या पंधरवड्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बॅंक खाती वर्ग केले आहे. यापुढील पेमेंटही लवकरात लवकर दिले जाणार असून शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहणार असल्याचेही त्यांनी प्रसंगी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)