डॉ. किसन महाराज साखरे यांना “ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार

पुण्यात पुस्कार वितरण सोहळा
मुंबई – संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार (सन 2017-18 ) डॉ. किसन महाराज साखरे यांना घोषित करण्यात आला आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी पुणे येथील पद्मावती चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रोख 5 लाख रुपये, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. यापूर्वी हा पुरस्कार रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. उषा देशमुख आणि हभप निवृत्ती महाराज वक्ते यांना प्रदान करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाड्‌.मयावर अध्यापन करत असून गेली 57 वर्षापासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड्‌.मयावर लेखन करीत आहेत. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे. आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेदेखील कार्य केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा, स्‌ोहम योग, योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी 100 हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)