डॉ. आंबेडकर यांच्या प्रतीमेची शिरसगाव येथे मिरवणूक

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील शिरसगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.21) रात्री 7 वाजता वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
शिरसगाव येथील जगदंबा माता मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. लंघे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश वाटचाल करत आहे. आजच्या तरूण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून वाटचाल करावी.
सुनील वाघमारे म्हणाले, नेवासा तालुक्‍यामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याची सुरुवात शिरसगावमधून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महान आहे. डॉ. आंबेडकरांनी सर्व सामाज बांधवांना सोबत घेऊन काम केले. आपण सर्व स्व. वकिलराव लंघे यांच्या विचारसरणीनुसार मार्गक्रमण करती आहोत. विठ्ठलराव लंघे हेही सर्वांनाबरोबर घेऊन त्यांचा वारसा चालवत आहेत.
योळी कॉ. बाबा आरगडे, माजी सभापती बाळासाहेब केदारे, शिक्षक गोर्डे, यडूभाऊ सोनवणे, शिरसगावचे सरपंच संजय लंघे, माजी सरपंच विठ्ठलराव नाबदे, पोलीस पाटील गणेश सोमुसे, प्रवीण लंघे, दिलीप पोटे, गणेश खंडागळे, सुरेश गायकवाड, संतोष खंडागळे, अरविंद खंडागळे, प्रदीप भालेराव, अमोल मोरे, संकेत खंडागळे, राहुल खंडागळे, चैतन्य खंडागळे, दिलीप खंडागळे, ऋषीकेश खंडागळे, विकास खंडागळे, आनंद वाकडे, प्रदीप खंडागळे, अमोल खंडागळे, महेश खंडागळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मिरवणूक पालखी मार्गे गोपाळपूर येथे वाजत-गाजत आणण्यात आली. गोपाळपूर येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा समारोप झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)