डॉ. आंबेडकर चौकात वाहतूक नियमनासाठी मेट्रोचे प्रयत्न

File photo

पिंपरी  – सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे पिंपरी ते हॅरिस पूल मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी खोदकाम होत आहे. परंतु या दरम्यान वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी मेट्रोने प्रयत्न करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुण्याच्या दिशेला जाणारे वाहतुकीचे नियमनाबाबत देखील मेट्रोकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा पिंपरी चिंचवड परिसरातील गजबजलेला चौक असून सर्व प्रकारची आंदोलने, मोर्चे, धरणे, सभा इत्यादी सामाजिक व राजकीय कार्यक्रम याच चौकामध्ये सतत होत असतात. त्यामुळे येथे वाहतूक सुरळीत राहणे खूप गरजेचे आहे. ही बाब ध्यानात घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खराळवाडी येथील ग्रेड सेपरेटर मर्ज इन पर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण 150 मीटर लांब व 4 मीटर रुंदीचे कॉंक्रीट करून वाहतूक सेवा या रस्त्यावरून सुरू केली आहे. या ठिकाणी रस्त्याचे साइडपट्टीचे काम देखील महामेट्रोकडून करण्यात आलेले आहे. या ठिकाणी महामेट्रोतर्फे 1 इन्स्पेक्‍टर ग्रेड- 1 व 3 ट्रॅफिक मार्शल नेमण्यात आले असून कोणतेही वाहन या रस्त्यावर थांबू न देण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाहतूक सुरळीत पार पडण्याकरीता पिंपरी वाहतूक शाखे मार्फत रस्त्यावर वाहन थांबल्यास दंडात्मक कारवाई सातत्याने करण्यात येत आहे. या व्यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खराळवाडी मर्ज इन पर्यंत सेवा रस्त्यावरील सर्व खड्डे हे महामेट्रोकडून कॉंक्रीटने बुजवण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)