“डॉ. आंबेडकरांचे सुरक्षाविषयक विचार’ अभ्यासक्रमाला मान्यता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बार्टीसोबत सामंजस्य करार
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.29 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज्‌ सेंटरला कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचार’ असा स्वतंत्र पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन केंद्र (बार्टी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बार्टीचे प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत महाजन, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. ए. डी. शाळिग्राम, विभागप्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांच्या नव्या पैलूंवर तरुणांनी संशोधन करावे हा आगळा विचार आहे.
डॉ. करमळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सुरक्षा विषयक प्रश्‍नांकडे कशा पद्धतीने पाहात हा अधिक सखोल संशोधनाचा विषय आहे. त्याविषयी या अभ्यासक्रमांतर्गत अध्यापन, संशोधन विद्यापीठात सुरू होईल. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नवा पायंडा शैक्षणिक क्षेत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाडला आहे, अशी माझी भावना आहे.
या विभागाचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी प्रा. डॉ. विजय खरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रा. डॉ. विजय खरे, हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी संरक्षण व सामाजिक शास्त्र या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा असून येत्या शैक्षणिक वर्षात 2018-19 मध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. यासाठी बार्टीने विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
– “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचार’ या पदव्युत्तर पदविका स्वरुपातील अभ्यासक्रमाला 2018-19 पासून म्हणजेच येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात करण्याची मान्यता प्राप्त झाली आहे.
– या अभ्यासक्रमासाठी 25 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यासाठीचे शैक्षणिक शुल्क आणि विद्यावेतन बार्टीच्या वतीने देण्यात येणार आहे. याविषयी बार्टी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)